वीक एंड जवळ आला की डोक्यात ट्रेक चे चक्र फिरायला लागते..... मग काय ट्रेकची बोलणी सुरु झाली इकडे जाऊ तिकडे जाऊ पण शुक्रवार पर्यंत ठरेना कुठे जायचं ते....... मग मी आणि श्रीराम ने ठरवलं की आपण कल्याणगड, वर्धनगड, महिमानगड, वारुगड आणि संतोषगड बघून येऊ.... मग काय ठरलच आणि सर्व तयारी झाली. सकाळी ५ वाजता माझाकडे जमायचं ठरलं...... शनिवारी सकाळी आम्ही ठरल्याप्रमाणे भेटलो आणि ५.३० ला आमचा प्रवासाला सुरुवात केली. एक तासाभरातच शिरवळ जवळील श्रीराम हॉटेल मध्ये आम्ही थांबलो. नाश्ता झाला आणि आम्ही कल्याणगडचा दिशेने निघालो. अर्थात navigation चालू केल होतच आणि साधारण १.५ ते २ तासात आम्ही कल्याणगडाच्या पायथ्याशी पोहोचलो. संपुर्ण रस्ताभर एक थेंबही पाऊस नव्हता, होत ते गार वार आणि ढगाळ हवा.
साधारण ९.३० वाजता आम्ही धुमाळवाडीस पोहोचलो आणि गड चढायला सुरुवात केली. आजूबाजुची हिरवळ मनाला प्रसन्नता देणारी होती. किल्ल्यावरून समोरच पवनचक्क्या दिसत होत्या. थोड्या पायऱ्या चढताच किल्ल्याचा दरवाजा लागला. मग काय photography सुरु झाली. दरवाजातून आत जाताच डाव्या बाजुस डोंगराच्या पोटात (गुहेत) लेणे मंदिर आहे. साधारण घोट्या एवढे पाणी गुहेत होते त्यातून वाट काढुन आणि torch on करून आम्ही आत मध्ये गेलो. खूप पाऊस असेल तर पाणी कमरे एवढे सुद्धा असते. आतमध्ये पार्श्वनाथ आणि दत्तात्रेयांचा मुर्ती आहेत. दरवाज्याचा वरच्या बाजूस गेल्यावर संतोषगडाचे दर्शन होते. तर दरवाजाचा उजव्या बाजुस वर गेल्यावर मारुतीचे मंदिर आहे. थोडंस पुढे गेल्यावर कल्याणस्वामींची समाधी आहे, समाधीचे दर्शन घेऊन आम्ही पुढे गेलो. पुढे गेल्यावर एक तळ आहे आणि ध्वज आहे. येथे आम्ही घोषणा दिली. ध्वजाच्या येथुनच साताऱ्याचा अजिंक्यताऱ्याचे दर्शन होते. तसेच थोडे मागे आले की चंदन, वंदन आणि वैराटगडाचे दर्शन होते. आता परत जायची वेळ झाली होती. आम्हाला अजून दोन किल्ले बघायचे होते. आम्ही पटापट खाली उतरायला लागलो, साधारण १५ - २०
वर्धनगडाचा दिशेने हालचाल सुरु केली.
आता ११.३० वाजले होते आणि आम्ही वर्धनगडाच्या पायथ्याशी पोहोचलो.
गोंदवलेमधे आम्ही साधारण ५.३० वाजता पोहोचलो. आज आमचा येथे मुक्काम होता. आम्ही गोंदवलेकर महाराजांच्या मठात भक्ती निवासात उतरलो होतो. संध्याकाळी ७.३० वाजता आरतीची वेळ होती. आमचाजवळ बराच वेळ होता, मग आम्ही सगळ आवरून गोंदवलेमधे दोन मंदिर आहेत ते बघायला निघालो. पहिले थोरले राम मंदिर आणि मग धाकटे राम मंदिर बघितले. धाकटे राम मंदिराच्या आवारातच शनीचे आणि दत्ताचे सुद्धा देऊळ आहे. एवढे सर्व बघून आम्ही आरती साठी पुन्हा आश्रमात आलो. ७.३० ला आरती सुरु झाली आणि ८.३० वाजता आम्ही प्रसाद भोजनाचा आस्वाद घेतला आणि भक्ती निवासाकडे गेलो. सकाळी साधारण ७ वाजता आवरून आम्ही वारुगड कडे निघालो.
सुमारे सकाळी ९.३० वाजता आम्ही वारुगडाच्या पायथ्याशी पोहोचलो. वारुगडावर पोहोचण्यासाठी दोन वाटा आहेत. पहिली ताथवडे मधून, हे गाव किल्ल्यावरच वसलेले आहे येथून बालेकिल्ला १० मिनिटांच्या अंतरावर आहे. दुसरी वाट गिरवी गावातून आहे, या वाटेने साधारण २.३० ते ३ तास गडावर पोचायला लागतात. वारुगडाच्या रस्ता सुरुवातीला असा वाटत की जणु आपण वाळवंटामधून जात आहोत, पण नंतर रुक्ष डोंगराचा कुशीतून रस्ता गेला आहे. वरुगडावर आम्हाला अजिबात ऊन लागले नाही. येथे संपूर्ण प्रवासात आम्हाला पहिल्यांदा चार थेंब (अगदीच चार) पावसाचे लागले, हवा ढगाळ होती. वारुगड प्रचंड विस्तारत पसरला आहे. राजांनी गडाची निवड अगदी योग्य केली होती. सर्व बाजूंच्या दर्याखोऱ्यात उभा असा वारुगड. बालेकिल्ल्यावरून बघितल्यावर असे भासते कि हा गड जिंकायला खरच किती कठीण आहे.
वरुगडावर दोन पाण्याची टाके आहेत. एका टाक्याला ५ दरवाजे आहेत आणि यातली एक वाट गडावर (बालेकिल्ल्यावर) आणि दुसऱ्या टाक्यावर जाते असं म्हणतात. ही टाके पांडवानी एका रात्रीत बांधल्याची नोंद बाजूलाच लिहिलेल्या एक फलकावर केली आहे. फलकाचे फोटो मी खाली टाकले आहेत. ही दोन पाण्याची टाके बघून आम्ही बालेकिल्ल्याच्या दिशेने निघालो आणि साधारण १० मिनिटात बालेकिल्ला गाठला. बालेकिल्ल्यावरून दिसणारे दृश्य अतिशय सुंदर होते. बालेकिल्ल्यावर एक सुकलेले टाके, एक विहीर, एक सदर आहे. एक नुकतेच बांधकाम चालू असलेले मंदिर आहे. तसेच ध्वजाच्या बाजूस काही अवशेष आणि एक जाते आहे. हा किल्ला पुर्णपणे न्याहाळून आम्ही संतोषगडच्या दिशेने हालचाल सुरु केली.
आता साधारण ११.३० वाजले होते. आम्ही संतोषगडाची वाट चुकलो. मग परत माघारी फिरून आम्ही फलटणमार्गे संतोष गडाकडे कूच केली. सुरवातीलाच आम्हाला सुंदर घाट लागला. वारुगडावरून लक्ष वेधणाऱ्या दऱ्याखोऱ्यातुन आम्ही आता जात होतो. १२.३० वाजता आम्ही फलटणला पोहोचलो. फलटणमधे जेवण करून आम्ही सुमारे १ वाजता संतोषगडच्या दिशेने निघालो. सुमारे २.३० वाजता आम्ही संतोषगडच्या पायथ्याशी पोहोचलो. गडावरती पाण्याची एक गुहा आहे जी आता बंद केली आहे. या वेळेस पावसाची कमतरता असल्याने त्याला जास्त पाणीही नाही. तसेच जवळच एक आश्रम आहे.
येथे पुण्याहून हडपसर भागातून एका संस्थेचे संवर्धनाचे काम चालू होते. त्यांनी बऱ्यापैकी झाडे लाऊन वृक्षारोपण केले आहे. गडाची तटबंदी उत्तम आहे. जिथे थोडीशी पडझड झाली आहे तेथे बांधकाम चालू होते. आश्रमात एक माताश्री आहेत ज्या सध्या गडाची देखभाल करतात त्यांचाशी आम्ही थोडा वेळ संवाद साधला. गावकऱ्यांनी सांगितले होते या माताश्रींना १४ भाषा बोलता येतात. त्यांच्याशी थोडा वेळ संवाद साधुन आम्ही गड उतरायला सुरुवात केली.
सुमारे ३.३० वाजता आम्ही पुण्याच्या दिशेने निघालो. परत येताना आम्ही लोणंद वरून निघालो. येथे वीर धरणाजवळ आम्ही थोडा वेळ आराम केला. नंतर पुढे नसरापूर ओलांडून टोल क्रॉस करून थोडस खायला आम्ही थांबलो. सुमारे संध्याकाळी ६ वाजता पुण्यात आगमन करून आम्ही आमच्या प्रवासाचा शेवट केला.
- साकेत घाणेकर
संपर्क : (saketghanekar7191@gmail.com)


