२
तासांच्या झोपेनंतर थंडीमुळे झोप आपोआपच उघडली. गोड गुलाबी थंडीत आम्ही sleeping बॅग मध्ये आडवे
पडलेलो, डोळे अजिबात
उघडत नव्हते, सुर्य
उगवायची वाट बघत गप्पा मारत आडवे पडलेलो. हळु हळु वेळ सारत गेली आणि ५ वाजता आम्ही
आमचा आळस झटकला. सर्व सामान अस्ताव्यस्त पसरलेले आवरायला घेतले, सर्व आवरून तयार होईपर्येंत बाहेर
उजाडले होते. समोरच धोडप डोके वर काढुन आमच्या चाललेल्या खटपटी बघत होता. स्टोव्ह
बाहेरच ठेवला होता , आम्ही
चहा बनवुन घेतला आणि शेजारी शेकोटी केलेली. सुर्य हळु हळु आमच्या मागुन डोकं वर
काढत होता आणि धोडपची शेंडी सोनेरी दिसु लागली. शाळेच्या व्हरांड्यात आम्ही बसलेलो, हातात चहाचा कप होता आणि समोर धोडप
सोनेरी रूप धारण करत होता. बस्स!! आमचा ट्रेक सार्थकी लागला, और क्या चाहिये life में! तासंतास त्याच्याकडे बघत राहावसं
वाटत होत.
रवळ्या - जवळ्या
रवळ्या - जवळ्या या जोडकिल्ल्यांना दोन
वाटा आहेत. एक वाट मुळणबारी खिंडीतुन, मार्कंड्याच्या
समोरचा डोंगर चढुन गेल्यावर आहे आणि दुसरी वाट मुळाणे गावातून आहे. आम्ही मुळाणे
गावातुन चढणार होतो. चला बराच वेळ आराम झाला, आता
निघायला हवे. सोबत खायला, पाण्याच्या
बाटल्या वगैरे घेतले आणि चालायला सुरुवात केली. आता पहाटेचे ७ वाजले होते, रविराज बऱ्यापैकी वर आले होते. मुळाणे
गावातुन डोंगराच्या डाव्या कोपऱ्यातुन एक सोंड सरळ खाली उतरलेली दिसते. या
सोंडेवरून आपण सरळ चढाई सुरु करायची. शेतातून एक पायवाट डोंगराला भिडते आणि हीच
वाट सरळ वर चढत जाते. या पायवाटेने आपण थोडं तिरप चढायला सुरुवात करायची. कळसुबाई
सारखे या किल्ल्यांना डोंगरांचे ४ टप्पे लागतात. पहिल्या २० मिनिटात आपण पहिल्या
पठारावर येतो. मागे नजर टाकल्यास कण्हेरगड दिसतो. आम्ही पायवाट सोडुन थोडी सरळ
चढाई चालु केली कारण थोड्या वेळाने पायवाट नाहीशी होते आणि पुर्ण वळसा न मारता सरळ
नागमोडी मार्गे चढायला सुरुवात करायची. साधारण तासाभरात आपण गडाच्या पदरात
असलेल्या पठारावर पोहोचतो. इथवर आल्यावर एक मार्किंग करून ठेवावे अन्यथा परत येताना रास्ता
चुकण्याचे चान्स जास्त आहेत.
पठारावर भरपुर झाडे आहेत, रवळ्या किल्ला उजव्या हाताला ठेऊन आपण
मळलेल्या पायवाटेने चालायला लागायचे. वाटेत जाता जाता आपल्याला बरेच अवशेष बघायला
मिळतात जुन्या इमारतींच्या ज्योती, पीर, खांबांचे अवशेष, समाधी आणि इतर अर्धवट तुटलेले अवशेष
आहेत. १०-१५ मिनिटे चालले की आपण दोन्ही किल्ल्यांच्या मध्ये असलेल्या पठारावर येऊन
पोहोचतो. इथे एक ३-४ घरांची वस्ती आहे याला तिवारी वस्ती म्हणतात. इकडे आम्हाला
मुंबईचे काही ट्रेकर्स भेटले,ते
सुद्धा नुकतेच आले होते. आमच्या सफरीत ते सुद्धा सहभागी झाले. या वस्तीच्या
बाजुलाच एक पुरातन टाके आहे पण यातील पाणी गुरे-ढोरे प्यायला वापरतात त्यामुळे
यातील पाणी पिण्यालायक नाही. या वस्तीपासून उजवीकडील वाट आपल्याला रवळ्या
किल्ल्यावर घेऊन जाते तर डावीकडील वाट आपल्याला जवळ्यावर घेऊन जाते. पहिले आपण
रवळ्याच्या दिशेने निघायचे. इथे एक पाण्याचे कुंड आहे, यातील पाणी पिण्यालायक आहे. किल्ल्यावर
जाणारी वाट सुरुवातीला जंगलातून असल्याने पटकन सापडत नाही पण एकदा वाटेल लागलो की
२० मिनिटात आपण एका घळीपाशी येऊन पोहोचतो. या घळीतून आपण चिमणी climb करत वर जायचे. इथे कातळात कोरलेली एक
गुहा आहे जी दोन्ही बाजूने ओपन आहे. थोडस पुढे चालत गेलं की कातळाच्या दुसया
बाजुला ही गुहा उघडते.
आत्तापार्येंत ९.३० वाजले होते.
येथे झाडांच्या थंड सावलीत आम्ही जरावेळ
अराम केला आणि परत झाडापाशी आलो. समोर आपण एका rock patch पाशी येतो. क्लाइंबिंग चे ज्ञान आणि
सराव असेल तर हा पटच आपण रोपशिवाय चढु शकतो पण शक्यतो रोप सोबत घेतलेला उत्तम.
मधल्या भागात एक रोप लावलेली आहे पण त्याच्या भरवश्यावर राहु नये. हा पटच केल्यावर
आपण गडाच्या माथ्यावर पोहोचतो. उजव्या हाताने सरळ गेल्यावर २ पाण्याची टाकी आहेत, यातील पाणी पिण्यालायक आहे. गडाचा माथा
संपुर्ण चढाईचा आहे. या टाक्यांपाशी आम्ही जरावेळ आराम केला आणि बालेकिल्ल्याच्या
दिशेने निघालो. जाताना वाटेत फक्त एकच झाड आहे आणि बाकी वाळलेले गवत.
बालेकिल्ल्याच्या मध्याच्या थोडं वर आल्यावर एक खराब पाण्याचे टाके आहे. हे बघुन
आपण सर्वोच माथ्यावर दाखल व्हायचे. येथे गडाचे कोणतेही अवशेष शिल्लक नाहीत. येथून
संपुर्ण सातमाळ डोंगररांगेचे दर्शन उत्तम घडते. रवळ्या किल्ल्याचा माथा जवळ्या
किल्ल्यापेक्षा मोठा आहे. सर्व नजारा बघुन मन मोहुन जात होतं, धोडप नजरेला नजर भिडवुन उभा होता. आज
तो वेगळ्या रूपात आम्हाला दिसत होता, एकदम
देखणा!! हा नजर बघुन आम्ही किल्ला उतरायला सुरुवात केली आणि पुन्हा टाक्यांपाशी
येऊन पोहोचलो. टाक्यांपासुन उजवीकडील वाटेने गेल्यावर आपल्याला बुरुजांचे अवशेष
दिसतात. येथुन गडावर यायला जुनी वाट असणार कारण पायथ्यापासुन नीट बघितले असता, बुरुजाच्या खालच्या बाजुस कातळात
पायऱ्या कोरलेल्या दिसतात. पण या वाटेची पडझड झाल्याने येथून जाण्याचा प्रयत्न करू
नये. आम्ही परत आल्या वाटेने तिवारी वस्तीमध्ये जायला निघालो आणि ११ वाजता वस्तीत
परतलो.
आम्ही तिवारी वस्तीत न थांबता जवळ्या
किल्ल्याच्या दिशेने कूच केली. जवळ्या किल्ल्यावर जायला २ वाटा आहेत. एक वाट
डावीकडील सोंडेवरून सरळ वर चढते. ही वाट पुर्ण घसाऱ्याची असल्याने शक्यतो टाळावी.
दुसरी वाट तिवारी वस्तीमधुन समोर चालत गेल्यावर उजवीकडील सोंडेवरून नागमोडी मार्गे
वर चढते. ही वाट मळलेली आहे, सोंडेच्या
मध्ये डोंगराच्या पदरात पोहोचल्यावर वाट डावीकडे वळते. या उजवीकडील वाटेने आम्ही
सरळ चालु लागलो. कातळ उजव्या हाताला ठेऊन कातळाला लागुन सरळ चालत जावे. थोडं पुढे
गेल्यावर उजव्या हाताला गुहा आहे. कदाचित येथे लेण्या कोरण्याचा प्रयत्न केला
असावा. अजून थोडं पुढे गेल्यावर डावीकडच्या सोंडेवरून चढून येणारी वाट इथे मिळते.
इथे कातळात कोरलेल्या पायऱ्या लागतात, अगदी
तळपायाचा अर्धा भाग मावेल एवढ्या या पायऱ्या आहेत. ही वाट थोडी बिकट आहे.
पायऱ्यांचा मार्गे गेल्यावर गडाचा कातळ कोरून काढलेला दरवाजा आहे. दरवाजाच्या
उजव्या बाजुला शिलालेख कोरलेला आहे. दरवाज्यातुन सरळ वरती गेले की डावीकडे एक वाट
वळते त्या मार्गाने जावे, पुढे
गुहा आहेत आणि यातील एका गुहेत पाणी आहे. पाणी स्वछ आणि पिण्याजोगे आहे, गुहेत आत शिरायला खिडकी सुद्धा आहे. हे
बघुन आम्ही उलटे फिरलो आणि वर चढु लागलो. समोरच आपण एका बुरुजापाशी येऊन पोचतो अँड
गडाच्या माथ्यावर दाखल होतो.
येथुन अप्रतिम नजर पाहायला मिळतो.
इंद्राई, चांदवड, कण्हेरा, धोडप, इखारा, कांचन तसेच रवळ्या, मार्कंड्या, सप्तशृंगी सुद्धा दिसतात. बाकीचे मंडळी
वर पोहोचेपर्येंत आम्ही या नजाऱ्याचा आनंद लुटत होतो. उंचच्या उंच कातळकडे आणि
खोलच्या खोल दऱ्या बघुन मन मोहुन जात होते. या गडांचे एक वैशिट्य असे की प्रत्येक
किल्ल्याच्या पदरात मोठे पठार आहे. (रवळ्या - जवळ्या, मार्कंड्या, सप्तशृंगी). असे वाटते जणू काही
डोंगरांवर डोंगर चढवले आहेत. गडावरून खाली पदरात असलेल्या पठारावर नजर टाकली असता
जुन्या इमारतींच्या ज्योती नजरेस पडतात. गडाच्या माथ्यावर जुन्या इमारतींचे अवशेष
आहेत तसेच घोड्यांच्या पागा बघण्यासारख्या आहेत. थोडसं पुढे गेल्यावर पाण्याची तीन
टाके आहेत, या पाण्यात थोडं शेवाळ आहे. पण थोडे
गाळुन घेतले असता यातील पाणी पिण्यालायक आहे. येथे थोड्या वेळ विश्रांती घेऊन
आम्ही परतीच्या वाटेला लागलो. परत उतरताना आम्ही पायर्यांचा मार्गे खाली आलो आणि
डावीकडे ना जाता उजवीकडे वळुन गुरवाटेने झाडीमधुन पठारावर पोहोचलो आणि आमचा आनंद
अगदी पोटात मावेनासा झाला. समोरच एक शिवलिंग उघड्यावर आहे आणि त्याबाजुलाच
पाण्याचे छोटे कुंड आहे. गुरे-ढोरे यातील अपनी पीत असल्याने हे पाणी खराब असुन
पिण्यालायक नाही. पुन्हा पठारावरून चालत आम्ही तिवारी वस्ती मध्ये परतलो.
आत्तापार्येंत दुपारचा १ वाजला होता. आतमधुन दादांनी आम्हाला ताक आणुन दिले. ते
पिऊन आम्ही मुंबईकरांचा निरोप घेतला आणि १.३० वाजता परतीच्या वाटेल लागलो. आल्या
वाटेने सावकाश उतरत ३.३० वाजता मुळाणे गावात दाखल झालो.
मुळाणे गावात पोचल्यावर हापस्यावर हात-पाय धुतले आणि
शाळेच्या आवारात जरावेळ आडवे झालो. येथुन पुढे धोडपला जायचे होते पण आमच्यातील एका
मित्राला परत घरी जायचे होते त्यामुळे आम्ही धोडप पुढच्या खेपेस करायचे ठरवले आणि
सातमाळ सफरला आळा घातला. तिघंही मित्रांची झोप नीट न झाल्याने हर्षल बाईकवर आणि मी
कार घेऊन संध्याकाळी ५ वाजता परतीच्या वाटेवर निघालो. निघताना धोडपला मुळाणे
गावामधुन नमस्कार केला आणि पुढच्या खेपेस परत येऊ असे म्हणत त्याचा निरोप घेतला.
गेले तीन दिवस आम्ही बाईक वर आणि किल्ले फिरूनसुद्धा गाडी चालवत होतो. वाटेत एका
ठिकाणी जेवण करून आम्ही पुण्याचा रास्ता पकडला आणि रात्री १ वाजता बाकीच्या
मित्रांचा निरोप घेऊन मी आणि हर्षल, हर्षलच्या
घरी मुक्कामाला गेलो. हे ५ दिवस अविस्मरणीय होते/आहेत, आमच्या
आयुष्यातले/ ट्रेकिंग लिफे मधले सगळ्यात आठवणींचे दिवस. आज (१९ नोव्हेंबर २०१७)
रोजी हा ब्लॉग/आठवण लिहीत असुन सुद्धा एक न एक क्षण जसाच्या तसा आठवत आहे. हे सगळं
लिहिताना असा वाट आहे गेल्या आठवड्यातमध्येच आपण सातमाळ सफर करून आलो आहे. पुढे
कधी संधी मिळाली तर सातमाळ सफर पुन्हा एकदा नक्कीच करेन आणि या वेळेस धोडपसहित करेन.
चला आता निरोप घेतो आणि पुढल्या वारीच्या तयारीला लागतो. :)
संपर्क : (saketghanekar7191@gmail.com)
