दिवस तिसरा (२९ नोव्हेंबर २०१५) : मोहनदरी
आज आमच्या प्रवासाचा शेवटचा
दिवस, दिवस तिसरा.
पाहते ६. ला
आरामात उठुयात असे ठरवले
पण छे ५.३०
लाच जाग आली.
आता जाग आलीच
आहे तर उशीर
कशाला असे म्हणून
आम्ही उठलो आणि सर्व समान आवरायला
लागलो. हर्शल चहा बनवत
होता तो पर्येंत
मी समान आवरत
होतो. आम्ही मस्त पैकी साजूक तुपातल्या शिऱ्याचा
आणि सोसायटी चहाचा
आस्वाद घेतला. मी पटेल
आणि भांडे धुवायला लागलो तोपर्येंत हर्शल बाहेर
जाऊन बाकीचे लोक
आले का ते
बघत होता. तो
त्याची bag आवरून पटपट पुढे निघून गेला. मी
माझी bag आवरून मागुन आलो
आणि तेवढ्यात हर्शल
म्हणाला साकेत बघ कोण आलाय. मी बघितलं
तर काय खुद्द
नाना (संजय अमृतकर)
आमच्या समोर होते
आणि सोबतीला मयुरेश जोशी सुद्धा होता. आज
आमचे भाग्य उजळले
होते. नानांसोबत ट्रेक
करण भाग्यात/नशि
बात
असाव लागत. सर्व मोठी
मंडळी आज आमच्या
सोबत होती.
सगळ्यांशी गाठ-भेट
झाली, गप्पा झाल्या
आता आम्ही सर्वांसोबत
चढायला सुरुवात केली. आता
८ वाजले होते. आम्हाला किल्ला पूर्ण
बघून पुण्याला परत
जायचे होते. साधारण
८. वाजता आम्ही
वरच्या बाजूस असलेल्या नेढ्यापर्येंत पोहोचलो. येथे नेढे
चढायला १६ फुटांचा
कातळ टप्पा पार
करावा लागतो. तसेच वरती आग्या मधमाश्यांचे साधारण
२-३ फुटांचे
पोळे होते. जास्त
आवाज करून चालणार
नव्हते. नशिबाने आमच्या जवळ रोप
होते. आम्ही त्या
रोपला गाठी मारून
ते वरती लावले.
साधारण ४५ लोक
त्या कातळ टप्प्यावरून
येणार होते. त्यांना
साधारण १ तास
लागेल म्हणून आम्ही
नेढ्याला डाव्या बाजूस वळसा घालून पुढे गेलो.
डाव्या बाजूस दरी तर
उजव्या बाजूस मोहनदरीचा कातळ
टप्पा. साधारण २० मिनिटे चालत गेल्यावर आम्ही खिंडीपाशी
येऊन पोहोचलो. ही
वाट जर बरी
असून डाव्या बाजूस
खूप exposure आहे. या खिंडीतून
वळसा घालून नेढ्याच्या
दुसऱ्या बाजूस जायचे होते.
हि वाट अजिबात
चांगली नाही. नशिबाने काल पाऊस
पडल्याने सगळी माती
बसली होती. या
वाटेने नेढ्यापर्येंत पोहोचायला ४० मिनिटे लागली. या वाटेने
नेढ्यापर्येंत पोहोचेपार्येंत सर्व लोक
नेढे चढुन आले
होते. आम्ही नवीन
वाट explore केली होती.
मोहनदरीचे नेढे म्हणजे
पिंपळा किल्ल्या नंतरचे सह्याद्रीमधील
दुसरे मोठे नेढे
आहे. नेढयामध्ये पोहोचून आम्ही बराच वेळ
विश्रांती घेतली. आता किल्ल्याच्या
सर्वोच्च माथ्यावर जाण्यास हालचाल
केली. नाना आणि मंडळी आधीच वरती
गेलेले. आम्ही trekshitiz सोबत वरती
जाऊ लागलो. सर्वोच्च
माथ्यावर पोहोचल्यावर
डाव्या बाजुस आणि उजव्या
बाजुस माची लांबवर
पसरलेली आहे. समोरच
सप्तशृंगी तसेच धोडपचे उत्तम दर्शन होते.
आम्ही आधी उजव्या
बाजूस असलेल्या माचीवर
गेलो. येथे एक
पाण्याचे टाके आहे आणि ध्वजस्तंभ
आहे. या टाक्यातील
पाणी पिण्याजोगे नाही.
येथून मोहनदरीच्या दुसऱ्या
बाजूचे उत्तम दर्शन होते. हे
बघून आम्ही दुसऱ्या
माचीच्या दिशेने निघालो येथे
मध्ये पाण्याचे ३
टाके आहेत. यातील एका टाक्याचे
पाणी पिण्याजोगे आहे.
येथून सरळ आम्ही
दुसऱ्या माचीवर गेलो. येथून
सातमाळ रांगेचे उत्तम दर्शन होते.
हे बघून आम्ही
टाक्यांपाशी परतलो आणि नानांसोबत
जेवण करायला बसलो. आता पर्येंत १ वाजला
होता. आमचे जेवण
उरकले आणि आम्ही
परतीच्या वाटेवर लागलो.
परत जाताना मोहनदर आणि
त्याच्या बाजुस असलेल्या डोंगराच्या
मध्ये असलेल्या नाळेतून
आम्ही उतरू लागलो. वाट फारसी
वापरात नाही पण
तरीही पायवाट आहे.
या वाटेने आम्ही
पहिली टेकडी पार
करून आम्ही वळसे घालत
पुढच्या बाजुस आलो. येथील
वाट थोडी घसाऱ्याची
असल्याने जर जपूनच
जावे लागते. साधारण १.५०
ला आम्ही पायथ्याशी
पोहोचलो. आम्ही थेट शाळेत
जाऊन पटापट समान
आवरले आणि बाईक घेऊन
सर्वांच्या गाडीपाशी आलो. येथे
आम्ही सर्वांचा निरोप
घेतला आणि परतीच्या
वाटेला लागलो. आजपण जेवण
नीटसे झाले नसल्याने
खूप भूक लागली
होती म्हणून वणी-नांदुरी रस्त्यावरील सौरभ हॉटेल मध्ये जेवण
उरकले. आता आम्हाला
२९० किमीचा प्रवास
करायचा होता. आम्हाला हॉटेल मधून निघायला दुपारचे ३
वाजले. नाशिक सोडताच एका
टपरीवर मस्तपैकी चहा मारला
आणि बाईकला किक मारली. मी एकदाच
मागे वळून बघितलं
आणि मनात म्हटले
सातमाळ करण्यासाठी परत येईन आणि पुण्याच्या दिशेने वाट
धरली. मजल दरमजल
करत आम्ही रात्री
१० वाजता पुण्यात
परतलो आणि आमच्या प्रवासाची सांगता केली.
आमचा हा plan पुर्ण व्हावा
या साठी ओंकार
आणि विकास ने
मदत केली या
बद्दल त्यांचे शतशः आभार अर्थात मला नाशिकचे
वेड लावणाऱ्या हर्षलचे
लाख आभार. आता
आमचा किडा एवढा
वाढला आहे की सातमाळ ५ दिवसात
करायचे स्वप्न आहे. बस
आता डोळ्यासमोर, स्वप्नामध्ये
सतत दिसत आहे
ती सातमाळ डोंगररांग.
संपर्क : (saketghanekar7191@gmail.com)
