दिवस पहिला (२७ नोव्हेंबर २०१५) : भिलाई आणि चौल्हेर
४५ दिवस होऊन
गेले पण ट्रेकचा
योग काही जुळत
नव्हता. इथे एक
आठवडा ट्रेकला नाही
गेल की अस्वस्थ
वाटत पण आता ४५ दिवस
होऊन गेलेले. हर्षलला
सुद्धा ट्रेक करून बरेच
दिवस झालेले. आता
बास ! ट्रेक झालाच
पाहिजे. मग काय दोघांनाही हुक्की आली
आणि टाकली सुट्टी
ऑफिसला. माझी यामाहा
तयार होतीच. शेवटी
काय अंगात किडे आमच्या मग म्हटलं
घेऊ बाईक आणि
निघू नाशिकला. मोठा
ट्रेक करायचं ठरलं.
मला तसा नाशिक
रिजन नवाच, पण हर्षलचे तसे बरेच
किल्ले झाले आहेत.
मग काय दोघांचेही
न झालेले किल्ले
म्हणजेच भिलाई, चौल्हेर, पिंपळा, प्रेमगिरी आणि मोहानदरी
करूयात असं ठरलं.
तीन दिवस ५
किल्ले. पुन्हा कपाटावरून bag आणि
tent काढणे आले.
आता एवढा मोठा
plan ठरल्यावर झोप कसली
लागतीये, तयारीला लागलो. तीन
दिवसां साठी लागणाऱ्या
सामानाची यादी तयार केली.
सगळा रस्ता, ठिक-ठिकाणी लागणारी गावं
तसेच किल्ल्यांच्या पायथ्याशी असणारी गावं
यांची माहिती जमवली. ट्रेकला लागणारा
खर्च काढला. सगळ्या
वस्तुंची जमवा-जमव
सुरु झाली. अगदी
दोर, पाण्याचे कॅन, टेंट सकट सगळी
तयारी झाली. शक्य
तेवढ्या गावातल्या माणसांचे नंबर
जवळ घेतले. आता
फक्त गुरुवारची आस लागलेली. गुरुवारी संध्याकाळी ६
वाजता निघायचे ठरले.
सगळी तयारी झाली
होती, बाईकला किक
मारायची बाकी होती. आठवडाभर आधी तयारी
झाली होती. आता
फक्त दिवस मोजत
होतो.
अखेरीस गुरुवार (२६ नोव्हेंबर
२०१५) उजाडला. ऑफिसचे
काम उरकले. bag तयार
होतीच. ५.३०
वाजता हर्षलच्या घरी पोचलो तर हा
गडी अजुन bag भरत
होता. त्याला आवरायला
आम्हीच मदत केली.
सगळी तयारी केली,
देवाला नमस्कार करून ६.३० वाजता
आम्ही हर्षलच्या घरून
निघालो. एक bag छातीवर, एक
छोटी bag पाठीवर, पायापाशी टेंट बांधलेला, गाडी चालवताना
जेमतेम समोरच दिसेल एवढीच
जागा. अशी कसरत
करत सगळ traffic पालथ घालत नाशिक फाट्याला लागलो.
मग पुढे चाकणच
घाणेरड traffic पार करून
मंचरला पोचलो. खूप भुक
लागली होती, मस्त
पैकी chinese rice खाल्ला आणि पुढे
निघालो. पुढचा ब्रेंक घेतला
तो थेट सिन्नरला.
मस्त पैकी जेवण करून पुढे निघालो.
मग संगमनेर पालथे
घालून नाशिकमध्ये १२
वाजता पोचलो. डांग
सौंदाणेला पोचायला अजून २ तास होते . आम्ही
तडख आग्रा हायवे
पकडला आणि सटाणा
फाट्यावर येऊन पोचलो.
येथे मस्त पैकी
चहा मारला आणि पुढे निघालो.
साधारण २.३०
वाजता आम्ही डांग
सौंदाणेला पोचलो.
डांग सौंदाणेला एक श्रीरामाचे
मंदिर आहे परंतु
हे मंदिर बंद
असल्याकारणाने आम्ही येथे थांबु
शकलो नाही आणि रात्री २.३०
वाजता कोणाला उठवणार.
मग आम्ही थोडे
पुढे गेलो येथे
डांग सौंदाणे गावाच्या
ग्रामपंचायत कार्यालयाचे ऑफिस आहे. या
ऑफिसच्या आवारात भरपुर जागा
आहे. आम्ही येथे
उतरलो आणि आमच्या
सोबत आणलेला तंबु उघडला. मस्त पैकी
ऐसपैस तंबूत आम्ही
३-४ तास
पडी टाकली. पहाटे
६ ला आम्ही
उठलो आणि पटापट
सगळे समान आवरले. आता आम्हाला
चिंता होती नाश्त्याची
कारण आमच्याजवळ स्टोव्ह
काढून नाश्ता बनवण्याएवढा
वेळ नव्हता. तेवढ्यात सकाळी फेरी
मारायला आलेल्या बोरसे काकांनी
आम्हाला बघितले आमची विचारपूस
केली. अगदी देवासारखे धावुन आले. त्यांनी
आम्हाला त्यांच्या घरी नेले,
मस्त चहा पाजला,
आम्ही आमच्या जवळ
असलेले समान त्यांच्या घरी ठेवले.
छोट्या bag मध्ये थोडेफार खायचे
समान आणि पाणी
बरोबर घेऊन आम्ही
त्यांच्या कडुन निघालो. त्यांनी आम्हाला रस्त्याची
पुर्ण माहिती एवढी
व्यवस्थित सांगितली की आपण
अगदी आपल्याच गावात फिरत आहोत असे
वाटत होते. डांग
सौंदाणे गावापासुन पुढे दगडी
साकोडे गाव पर्येंत
जावे लागते. या
गावातुन सटाणेला जाणाऱ्या मार्गावर आवळबारी
(खिंड) आहे. या
खिंडीत गाडी लावुन
उजव्या बाजुस असलेल्या सोंडेवरून गडावर जायला वाट आहे.
दुर्दैवाने
या किल्ल्याच्या इतिहासाची
माहिती उपलब्ध नाही पण
हा किल्ला डांग
सौंदाणे आणि परिसरावर
नजर ठेवण्यास उभारण्यास आला असावा.
आधी हा किल्ला
आहे हे आजूबाजूच्या
गावातील लोकांना माहित नव्हते.
त्या नंतर बर्याच जुन्या ट्रेकर्सनी
या किल्ल्याला भेट
दिल्यामुळे हा
किल्ला आता ज्ञात
आहे. या गडावर
फारसे अवशेष उपलब्ध नाहीत. आवळबारी खिंडीत
आम्ही गाडी लावुन
साधारण ७.३०
वाजता उजव्या बाजूस
असलेल्या धारेवर सरळ चढाई सुरु
केली. येथून १५
मिनिटात आपण किल्ल्याच्या
पहिल्या टप्प्यात येऊन पोहोचतो.
येथे लांबलचक असे पठार आहे.
येथून किल्ल्याच्या कातळकड्याचे
उत्तम दर्शन होते.
तसेच आपल्या डाव्या
बाजुस डोलबारी डोंगररांगेचे उत्तम
दर्शन होते. येथे
आम्ही आमच्या जवळ
असलेले खाद्य पदार्थ काढून
नाश्ता करून घेतला.
पुढे ४५ मिनिटात गडाच्या शेवटच्या टप्प्यात
असलेल्या टाक्यांपाशी येऊन पोहोचलो.
येथुन थोडीशी खडी
चढण करून आपण गडाच्या सर्वोच्च माथाय्वर
असलेल्या ध्वजापाशी पोहोचतो.
सर्व गड फिरून
झाला होता. आम्ही
परत खाली उतरून
टाक्यांपाशी उतरलो. येथे थोडा
वेळ विश्रांती घेतली
आणि गड उतरायला सुरुवात केली. आम्हाला
आज अजुन चौल्हेर
गड पण फिरायचा
होता. साधारण ४०
मिनिटात गड उतरून आम्ही आवलबारी मध्ये पोहोचलो.
येथून परत आम्ही
डांग सौंदाणेला आलो.
बोरसे काकांकडून आमचं
समान घेतलं, त्यांचे आभार मनात
त्यांचा निरोप घेतला आणि
चौल्हेर किल्ल्याच्या दिशेने रवाना झालो.
वाडी चौल्हेर हे
गडाच्या पायथ्याचे गाव आहे.
फारसा वेळ नसल्या
कारणाने आम्ही लवकर निघालो.
डांग सौंदाणे ते
वाडी चौल्हेर साधारण
१ तासाचा रस्ता आहे. डांग
सौंदाणे गावातुन आपणास प्रथम
तिळवण गावात यावे
लागते. येथून १० मिनिटात
आपण वाडी चौल्हेर गावात पोहोचतो.
वाडी चौल्हेर गावात
एक शाळा आहे
आणि या शाळेला
छोटस पटांगण आहे.
आता पर्येंत दुपारचा १ वाजला
होता. आम्ही वाडी
चौल्हेर मध्ये या शाळेत
पाय-उतार झालो.
शाळा भरलेली होती.
आम्ही येहते पोहोचताच सगळी चिमुरडी
कोण आलं असं
बघत पळत पळत
बाहेर आली. येथे
असलेल्या गुंजाळ आणि सोनावणे सरांशी आमचा परिचय
झाला. त्यांनी आम्हाला
गडाचा नकाशा दाखवला
आणि गडावर जाण्याची
वाट दाखवली. (अगदी मेगा हायवे आहे.).
येथे शाळेत आम्ही आमचे सामान ठेवले आणि आवरलं.
वाडी चौल्हेर हे जरी
गडाच्या पायथ्याचे गाव असले
तरी हा किल्ला
तिळवणचा किल्ला म्हणुन प्रसिद्ध
आहे. या किल्ल्याला
शिवरायांच्या काळात फार महत्व
होते. वाडी चौल्हेर
गावातुन या किल्ल्यास
पोहोचायला दोन टेकड्या पार करून जावे
लागते. पहिली टेकडी पार
केल्यावर खडी चढण
(छातीवर) सुरु होते.
हा किल्ला गिरणा
आणि आरम नद्यांना विभागुन त्यांच्या मध्यस्थी
उभा आहे. किल्ल्यावर
पोहोचायला जरी वेळ
लागत असला तरी
किल्ल्याचा माथा फार मोठा
नाही. वाडी चौल्हेर
गावातून या किल्ल्यावर
पोहोचायला साधारण १.३०
तास लागतो. आम्ही
पटापट आवरून १.३०
वाजता गड चढायला
सुरुवात केली. उन्हाची तिरीप
लागत होती, जेवायचे
भान नव्हते. भूक
तर लागलेली पण किल्ल्याच्या
माथ्यावर लवकरात लवकर पोहोचायचे
होते. आमच्याजवळ असलेले
खजूर खाऊन आम्ही गड चढत होतो.
पहिली टेकडी पार
केली - दुसरी टेकडी पार
केली नंतर समोर
एक विश्रांतीसाठी एक
झाड नजरेस आले. झाप झाप
पाऊले पडू लागली.
त्या झाडाच्या सावलीत
बसून मागे वळून
पाहिलं. रम्य ते
गाव दूरवर कुठेतरी टेकडीच्या पल्याड
दिसत होत. निव्वळ
५० मिनिटात आम्ही
येथवर येऊन पोहोचलो
होतो. वर बघितले
आता सगळी खडी चढण होती.
पार तुमची छाती
फुललीच पाहिजे. ५ मिनिटे
येथे विश्रांती घेऊन
आम्ही गडाचा राहिलेला
शेवटचा टप्पा चढायला लागलो. आमच्या
उजव्या बाजुसच दीर-भाऊजय
डोंगर दिसत होता.
सुर्य डोक्यावर होता
फार तापला होता. आम्ही चेहरा आणि
मन रुमालाने झाकुन
चढत होतो. साधारण
२५ मिनिटात आम्ही
गडाच्या पहिल्या दरवाज्यापाशी
येऊन पोहोचलो.
चौल्हेर किल्ल्यावरून साल्हेर सालोट्यासकट सर्व
डोलबारीचे दर्शन होत होते.
खूप ऊन असल्या
कारणाने स्पष्ट असे काही
दिसत नव्हते. मागील
बाजूस अगदी फुसट
असा मांगी तुंगीचे
दर्शन झाले. तर
खूप धुक असल्या कारणाने सातमाळ पर्वत
रांगेचे दर्शन आम्हास झाले
नाही. पोटात काही
नसताना आम्ही तब्बल १.१५ तासात
गडाच्या पहिल्या दरवाज्यापाशी येऊन
पोहोचलो. या दरवाज्याला
जोडून उत्तम अश्या
पायऱ्या आहेत. गडाच्या या टप्प्या
पासुन ते माथ्य
पर्येंत पोहोचेसतोर एकूण सात
दरवाजे आहेत. अतिशय सुस्थितीत हे दरवाजे
आहेत. या दरवाज्यांची
रचना बघुन तुम्हाला
आलेला थकवा आणि
शीण कुठच्या कुठे पळून जाते. या दरवाज्यांची
रचना, यावरील नक्षीकाम,
कोरीवकाम अतिशय सुंदर असे
आहे. बारकाईने पहिले असता प्रत्येक
दरवाज्यात काही न
काही वेगळे असे
नक्षीकाम दिसते. हे सर्व
बघत असता भूक
पार पळून गेली होती.
हे दरवाजे पार
करत आम्ही गडाच्या
माथ्यावर दाखल झालो.
यथील शेवटच्या दरवाज्याच्या
माथ्यावर एक बुरुज
बांधला आहे. या
बुरुजावरील सपाट जागेवर
एक तंबू मावेल
एवढी जागा आहे. या बुराजाच्या
बाजूसच उघड्यावर शंकराची पिंड
आहे. शेवटच्या दरवाज्यापासून
दोन वाटा आहेत. डावीकडील वाट गडाच्या
एक माची वर
तर उजवीकडील वाट
गडाच्या बालेकिल्ल्यावर घेऊन जाते. आम्ही प्रथम डावीकडील वाटेने
गडाच्या माचीवर गेलो. येथे
शवाल साठलेल्या पाण्याची
दोन टाके आहेत तसेच एक कोरडा
पडलेला छोटा तलाव
आहे. माचीच्या शेवटी
दुरावस्थेत एक बुरुज
आपणास दिसतो. येथून समोरच एक अनोळखी डोंगररांग दिसते. यातील समोरच असलेल्या डोंगराचा लांबलचक कडा आपणास हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्याची आठवण करून
देतो.
हे बहुन
आम्ही माघारी फिरलो.
आता मात्र खूप भूक लागली
होती. आम्ही माघारी
फिरून दरवाज्यापाशी पोहोचलो.
येथून समोर नजर
टाकली असता चौरंगनाथाची,
गणेशाची मुर्ती असलेले पत्र्याने
झाकलेले छोटे मंदिर
दिसते. बालेकिल्ल्याचे कातळाच्या डाव्या बाजूस असलेल्या पायवाटेने
आम्ही पुढे गेलो.
येथे एक छोटास
सुंदर अस मंदिर
आहे, ते बघून आम्ही माघारी फिरलो आणि
दरवाज्यापाशी आलो. येथुन
उजव्या बाजूस असलेली पायऱ्यांची
वाट आपणास बालेकिल्ल्यावर
घेऊन जाते. या
वाटेवरून थोडस वरच्या
बाजुस आल्यावर क्रमशः
४-५ पाण्याचे
टाके आहेत. यातील पहिल्या (मोती) टाक्याचे
पाणी पिण्याजोगे आहे.
आम्ही येथे थोडा
वेळ विश्रांती घेतली,
आमच्या जवळ असलेल्या खाद्य पदार्थावर
ताव मारला आणि
पायऱ्यांच्या मार्गे बालेकिल्ल्याच्या दिशेने
कुच केली. येथे आपणास बालेकिल्ल्याचा पडका
दरवाजा लागतो. या दरवाज्यातुन
आतमध्ये प्रवेश केल्यावर समोरच राजवाड्याचे
अवशेष आढळून येतात.
यापुढे येथे पाण्याची
तीन टाके आहेत.
यातील पाणी पिण्याजोगे नाही. येथुन पुढे समोरच ध्वजस्तंभ आपल्या दृष्टीक्षेपास येतो. एवढे सगळे बघून आम्ही माघारी फिरलो.
आता पर्येंत दुपारचे ३.४५ वाजले
होते. आम्ही पटापट
खाली उतरायला लागलो.
दुपारचे जेवण नीटसे
झाले नव्हते त्यामुळे भूक लागली
होती. डोळ्यासमोर दिसत
होता स्टोव्ह आणि
त्यावर शिजणारी maggie. maggie च्या
वासाने पाऊले झप झप
पडत होती. तोंडाला
साधारण तासाभरात म्हणजेच ४.४५ ला
आम्ही वाडी चौल्हेर गावात परतलो.
येथे आम्हाला एवढ्या
लवकर आलेले बघून
सोनावणे आणि गुंजाळ
सर आश्चर्यचकित
झाले. त्यांच्याशी आता
आम्ही निवांत गप्पा
मारत बसलो. आता
भरपूर वेळ हातात
होता त्यामुळे पडी मारायची
गरज होती. आम्ही
आमच्याजवळ असलेला तंबू बाहेर
घेऊन आलो. सगळी
चिमुरडी परत येउन आमच्या
सभोवती गोळा झाली.
बारकाईने निरीक्षण करत होती
आता आम्ही नक्की
काय करतोय. आम्ही त्यांना तंबू
कसा लावायचा, त्याचा
उपयोग काय याची
सर्व माहिती दिली.
चल आता भूक तर होतीच, झोपायची तयारी
सुद्धा झाली होती.
आता पर्येंत ५.१५ वाजलेले.
शाळा सुटली आणि
गुंजाळ सरांनी शाळेच्या चाव्या आमच्या
हातात दिल्या आणि
आमचा निरोप घेऊन
ते निघुन गेले.
आम्ही आता मस्तपैकी स्टोव्ह काढुन maggie बनवले
आणि २ मिनिटात
सगळे maggie फस्त. मग मस्तपैकी
बाहेर तंबुत २ तास
झोप काढली. ८.३० वाजता
उठून परत जेवणाची
तयारी सुरु केली.
९.३० वाजता
जेवण आटपून परत झोपी गेलो.
संपर्क : (saketghanekar7191@gmail.com)
